|| व्यवस्थापन समिती |

संस्थानचा कारभार पाहण्यासाठी सात जणांचे विश्वस्तमंडळ आहे. हयात खालील पदाधिका-यांचा समावेश आह . प्रत्येक विश्वस्ताकडे संस्थानचे काम दिलेले असते. नविन विश्वस्त जुने विश्वस्तमंडळ एकमताने निवडतात. आजचे विश्वस्तमंडळ खालील प्रमाणे आहे.
क्रं. विश्वस्त मंडळ पद
1 श्री ना.ग.खेडकर अध्यक्ष
2 श्री वसंत महादेवराव सस्तकार व्यवस्थापक
3 श्री विनायक दिगंबरपंत सोनटक्के कोषाध्यक्ष
4 श्री उमाकांत पुरूषोत्तम पांडे; कार्यक्रम प्रमुख
5 श्री श्रीपाद यशवंतराव पळसोकर पालखी पारायण व पुस्तक विक्री विभाग प्रमुख
6 श्री दिगंबर राजाराम बरडे भोजन प्रमुख
7 श्री प्रकाश वसंतराव घुडे हिशेब तपासणीस व स्वच्छता प्रमुख
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान,कारंजा हे जागृत देवस्थान आहे असे अनुभव विश्वस्तमंडळास व येथे येणाया भक्तमंडळीस येत असतात. त्यातील काही अनुभव येथे देण्यात येत आहेत.

विश्वस्तमंडळास खालील प्रमाणे अनुभव 10 वर्षापूर्वी आलेला आहे. संस्थानच्या पाकगृह व भोजनकक्षाचे बांधकाम सुरू होते. सुमारे 5 लाख खर्च झाल्यानंतर संस्थानच्या बचत खात्यातील रक्कम संपली व आणखी 5 लाख रूपयांचे काम व्हायचे होते. संस्थानच्या काहीFDRS बँकेत होत्या व त्याcashकरून घेतल्यास संस्थानाचे व्याजाचे बरेच नुकसान झाले असते म्हणून सर्व विश्वस्तांच्या मतेFDRS च्या तारणावर कर्ज घेऊन काम पूर्ण करण्याचे ठरले. त्याप्रमाणे स्थानिकState Bank शाखेकडून 5 लाख कर्ज मंजूर करून घेण्यात आले.पण संस्थानलाState Bank कडून कुठलेहि कर्ज घेण्याची आवश्यकता पडली नाही व व 5 लाखाचे काम पूर्ण झाले. आणि विश्वस्तमंडळीच्या माहिती प्रमाणे फक्त एकच 5000 रू. मोठी देणगी आठवते बाकी सर्व काम लहान लहान देणग्यातून संपन्न झाले. असे अनेक अनुभव विश्वस्तमंडळास वेळोवेळी येत असतात.